जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट व जनरेशन 3 सेंसर किट उद्घाटन संपन्न

उद्योगमंत्री मा श्री उदयजी सामंत साहेब यांच्या हस्ते जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट व जनरेशन 3 सेंसर किट उद्घाटन संपन्न
आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ व जनरेशन थ्री सेंसर कीट रत्नागिरी तालुक्यात उद्योग मंत्री उदय ची सामंत साहेब यांच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आली
या मॅटचे व सेंसर चे उद्घाटन दिनांक 18 एप्रिल रोजी बॅडमिंटन हॉल छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मारुती मंदिर येथे उद्योग मंत्री मा., श्री उदय सामंत जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. विजय शिंदे श्री. बीपीन बंदरकर शिवसेना जिल्हा शहरप्रमुख सौरभ मालुष्टे नगरसेवक तायक्वांदो प्रशिक्षक प्रशिक्षक शाहरुख शेख प्रशांत मकवाना मिलिंद भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
तसेच नुकत्याच झालेल्या जागतिक ब्लॅक बेल्ट प्रमोशन टेस्ट मध्ये उत्तीर्ण झालेल्या खेळाडूंना ब्लॅक बेल्ट व प्रमाणपत्र देऊन मा. श्री. उदयजी सामंत यांनी शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमासाठी एस आर के व गणराज तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी खेळाडू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र तसेच रत्नागिरी तायक्वॉंदो स्पोर्ट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी
मंत्री महोदय साहेबांचे आभार व्यक्त केले आहेत.
